01/09/2025, 06:20 pm
अंबोली गावात सरकारच्या जलसंपदा योजनेंतर्गत पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. गावकऱ्यांना स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी वाटर टँक, पंप आणि पाईपलाइन नेटवर्क तयार केले गेले आहे. या योजनेमुळे पाणीपुरवठा नियमित झाला असून शेतकरी आणि नागरिकांना पिण्याचे तसेच शेतीसाठी आवश्यक पाणी सहज उपलब्ध झाले आहे.
05/08/2025, 06:22 pm
गावात सरकारी शाळा, आश्रम शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून शिक्षण व आरोग्य सेवा पुरवल्या जातात. सरकारच्या विविध योजनांमार्फत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, मोफत पुस्तके, अन्नधान्य योजना तसेच आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. यामुळे गावकऱ्यांना दर्जेदार शिक्षण व आरोग्य सुविधा मिळतात.